गुन्हेगारीबुलढाणा

शेगांव : वेगवेगळ्या भागातून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर
श्याम पहुरकर

मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रणाण वाढलं आहे. दुचाकी चोरणारी टोळीच बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय होती. दरम्यान पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम ( ३८ ) याला ताब्यात घेवुन दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली होती.

यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सैय्यद वसिम पोपटाप्रमाणे बोलू लागला व गुन्ह्यांची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती दिली. त्याच्या सोबत आणखी काही जण या टोळीत असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहीरीत टाकत होते. चौकशीत ही माहिती उघड झाली.

चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहीरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेलं असून आणखी एका विहिरीत सुद्धा अश्या दुचाकी असल्याची माहिती आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button