खानदेशजळगावा जिल्हाभुसावळमहाराष्ट्रमुक्ताईनगर

जे. ई. स्कूलमध्ये मराठी अभिवाचन स्पर्धा आयोजन

मुक्ताईनगर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे ‘मराठी अभिजात भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांच्या वाचनकौशल्याला, भाषिक अभिव्यक्तीला व आत्मविश्वासाला चालना देण्यासाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख उपशिक्षक एस. आर. ठाकूर यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

स्पर्धेचे प्रमुख उपशिक्षक एस. एस. सावकारे तसेच उपशिक्षिका पी. एस. बढे यांनी स्पर्धेचे नियोजन व आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अभिवाचनाची संकल्पना स्पष्ट करून, प्रभावी वाचनासाठी उच्चार, स्वर, गती, भावभावना आणि आशय यांचे महत्त्व विशद केले.

या अभिवाचन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या ९० विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता ८ वी ते १० वीच्या ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध साहित्यकृतींचे प्रभावी व भावपूर्ण अभिवाचन करून उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमास उपप्राचार्या, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान, वाचनाची आवड आणि साहित्याची गोडी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा परिचय करून देत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देणारा हा अभिवाचन स्पर्धेचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button