दुष्काळग्रस्त भूमिहीन शेतमजुरांना 50,000 हजारांची थेट मदत द्या. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन:साहिल वाकोडे यांना न्यायमिळवून देणे;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.७/१०/२०२६.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर आणि शेतकरी कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर, दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक पात्र भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला कोणतेही जाचक अटी न लादता थेट 50, हजाराची तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ वानखडे यांचे नेतृत्वाखाली संग्रामपूर तहसीलदार मार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना एक सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे. या निवेदनात प्रशासनाचे लक्ष वेधताना पॅंथर सेनेने म्हटले आहे की शासनाने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना घोषित केल्या आहेत. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र शेतात पेरणी पासून ते कापणी पर्यंत प्रत्यक्ष नवरात्र कष्ट करणारा भूमिहीन शेतमजूर वर्ग आज रोजगार नसल्यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. स्वतःची जमीन नसल्यामुळे या मजुरांना शेतकरी म्हणून मिळणारे शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. जे अत्यंत अन्यायकारक आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक पात्र भूमीहीन शेतमजुर कुटुंबाच्या बँक खात्यात कोणतीही अनावश्य अटी न लागता 50 हजार रुपये थेट आर्थिक मदत तातडीने जमा करण्यात यावी.
२) भूमिहीन शेतमजुरांना वर्षभर हक्काचा रोजगार मिळावा. यासाठी रोजगारांच्या दिवसाची निश्चिती करण्यात यावी. तसेच त्यांना विमा संरक्षण करण्यात यावे.
३) शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात यावे.
शेतकरी शेतीचा पोशिंदा असेल, तर भूमीहीन शेतमजुर हा त्या शेतीचा कणा आहे. नियमित उत्पन्न नसल्याने आज ग्रामीण भागातील मजुरासमोर उद्याचा दिवस कसा काढायचा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदपत्री घोषणा न करता या कष्टकरी वर्गासाठी स्वतंत्र आणि तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे”अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन शोधण्याचा इशाराही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.



