वेगवेगळ्या घटनेत शेगावातून दोन तरुणी बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव वेगवेगळया घटनेत शहरातून दोन तरुणी बेपत्ता झाल्या असून या प्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.येथील मोदी नगरातील रहिवासी कु. नम्रता सुरेश टेंग (19) ही तरुणी 16 फेब्रुवारी रोजी घरी कुणाला काही न सांगता निघून गेली.मात्र परत आलीच नाही. यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. यामुळे याबाबत तिचा चुलत भाऊ विशाल ढंग याने शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. तर दुसऱ्या घटनेत गौलखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात राहून शिकणारी विद्यार्थीनी कु. भारती देवानंद सिरसाठ (18) ही 15 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असे सांगून वसतीगृहातून गेली मात्र परत आलीच नाही. याबाबत वसतीगृह कर्मचा शुभांगी राऊत ज्यांनी कु. भारतीच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले. त्यावरून नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेवून ही ती मिळून आली नाही. यामुळे याबाबत तिचे मामा सागर भोजने यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.



