अपघातबुलढाणामलकापूर

लोणवडी भीषण अपघात एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर !

मलकापूर प्रतिनिधी

लोणवडी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ८ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला.

मृत युवकाचे नाव धीरज विष्णू सपकाळ (२४, रा. तालखेड, ता. मोताळा) असे आहे. पिंपळगाव देवी येथून मलकापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची समोरासमोर दुसऱ्या चारचाकीशी जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे चालक आणि एकूण पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल टप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने मलकापूरच्या रुग्णालयात दाखल केले. चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button