जळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्याविनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ आज शनिवार दिनांक २५ व रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.
या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे. हे शिबिर संपूर्ण: मोफत आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील मकरंद महाजन यांच्याशी ९७६५२७११८८, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button