जळगावा जिल्हाभुसावळ

रेल्वे पुलावर भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी


चाळीसगाव – शहरातील रेल्वे पुलावर सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
या अपघातात अर्जुन अनिल नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी पूनम अर्जुन नरवाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघेही बाजार करून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला.
नरवाडे दाम्पत्य हे मूळ जामनेर येथील रहिवासी असून कामानिमित्त चाळीसगावातील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास होते.
अपघातावेळी तेथून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून नागरिकांच्या मदतीने जखमींना अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button