खानदेशजळगावा जिल्हा

रावेर लोकसभा अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती

सावदा, ता. यावल (प्रतिनिधी) :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सुरू असलेल्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाअंतर्गत रावेर लोकसभा मतदारसंघातील सावदा येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.

सावदा येथील नगरपालिका रुग्णालयात श्रीमती खडसे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” (#SNSPA) अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात आल्या. श्रीमती खडसे यांनी या शिबिराची पाहणी करून वैद्यकीय सेवांचे कौतुक केले.

याशिवाय परिसराच्या हरितीकरणासाठी “एक पेड़ मां के नाम” या अभियानाअंतर्गत सावदा नगरपालिका रुग्णालय व पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सेवा हीच आमची ओळख असून जनतेच्या सेवेतूनच खरी राजकारणाची पूर्तता होते,” असे मत श्रीमती रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button