रावेर लोकसभा अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत आयोजित कार्यक्रमास, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, “सेवा हाच संकल्प – भारत हिच पहिली प्रेरणा” अंतर्गत प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी जी* यांनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” (SNSPA) चा शुभारंभ केला असून, सदर उपक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आरोग्य शिबिर आयोजित केले असता, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आरोग्य सेवा सुविधांची पाहणी केली.
या मोहिमेचे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे आहे, सेवेची पोहोच, गुणवत्ता आणि जागरूकता सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” हे एक महत्त्वाचे आरोग्य अभियान आहे जे २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंती पर्यंत चालेल. या मोहिमेमध्ये आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये १ लाख आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आले असून. ही शिबिरे विशेषतः महिला आणि बालकांच्या विशिष्ट आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी, पोषण, आरोग्य जागरूकता आणि एकूणच कुटुंब कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केली गेली आहे. जास्तीतजास्त महिलांनी सदर “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान मध्ये आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आवाहन केले.



