Uncategorized

रस्त्यावरील मास विक्रीच्या दुकानांवर तहसीलदाराची कारवाई,;मुख्याधिकारींची तातडीची नोटीस…

वाशिम (अजय गायकवाड )

मालेगाव : – नगरपंचायत हद्दीतील शेलू फाटा ते ना ना मुंदडा विद्यालय आणि हिंदू मोक्षधाम परिसरातील मास विक्रीच्या दुकानांवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे वारंवार तक्रारी आणि उपोषणाचा इशारा मिळाल्यानंतर तहसीलदारांनी नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज सोनोने यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार,मुख्याधिकारी सोनोने यांनी संबंधित मास विक्रेत्यांना तातडीने नोटीस देत रस्त्यावरील दुकान बंद करण्याचा आदेश दिला आहे याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून,प्रशासनाने वेळेत पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच,शेलू फाटा ते शिरपूर जैन रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणीही प्रशासनाने गंभीरतेने घेतली असून लवकरच याबाबतही कार्यवाही करण्यात येणार आहे.
सुनिल शर्मा यांनी प्रशासनाच्या या पावलांचे स्वागत करताना सांगितले की, “आमच्या मागण्यांची दखल घेतल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो मात्र,आम्ही या निर्णयाच्या अंमलबजावणीवर सतत लक्ष ठेवून राहू जर कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत,तर आम्ही आमचा उपोषणाचा इशारा कायम ठेवणार आहोत.”

बॉक्स…
तहसीलदारांनी सांगितले की, “रस्त्यावरील मास विक्रीच्या दुकानांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेकजण या समस्येने प्रभावित झाले आहेत सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठी ही दुकानं बंद करणे आवश्यक आहे आम्ही याप्रकरणी कठोर पावले उचलू आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू.”
मा.दिपक पुंडे तालुका दंडाधिकारी मालेगांव,

बॉक्स…
मुख्याधिकारी पंकज सोनोने यांनीही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे त्यांनी म्हटले की, “स्थानिक नागरिकांच्या तक्रारींना लक्षात घेऊन आम्ही संबंधित मास विक्रेत्यांना नोटीस पाठवली आहे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे त्यामुळे मास विक्रीची दुकानं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
मा.पंकज सोनुने मुख्याधिकारी नगरपंचायत मालेगाव,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button