Uncategorized

आमदार अमित झनक यांनी घेतली वाशीम जिल्हाधिकारी व अकोला कार्यकारी अभियंता यांची भेट

शेगाव पालखी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

वाशिम (अजय गायकवाड )

वाशिम : दि 10 जाने
गण गण गणात बोते च्या गजराने वाशिम जिल्ह्यातील विविध गावातून नियमित शेगावाला श्री च्या दर्शनासाठी पायदळी जाणाऱ्या भक्तांसाठी मेडशी मार्गे जाणाऱ्या शेगाव पालखी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून. पालखी घेऊन जाणाऱ्या श्रींच्या भक्तांसाठी हा मार्ग तातडीने पूर्ण करून, येण्या जाण्यासाठी मोकळा करून देण्यात यावा . पालखी रस्त्याचे विकासकाम उत्तम दर्जाचे करण्यात यावे अशा मागणी व विविध विषयावर माननीय आमदार अमित सुभाषराव झनक यांनी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस मॅडम तथा कार्यकारी अभियंता मा.प्रसाद पाटील साहेब अकोला यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित मेडशी गावचे युवा सरपंच शेख जमीर शेख गणी, मा पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे. बबलू जैन, मा.सरपंच रमजान गवरे मा.ग्रामपंचायत सदस्य समाधान तायडे,कालू गवरे ,छट्टू गवरे,मन्नान रेघीवाले, संजय भागवत, धीरज मंत्री,पांडुरंग मांडोगळे व इतर बळीराजा मित्र मंडळ उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button