
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे ता.प्रतिनिधी
हिवरखेड दि. ०७ ; हिवरखेड प्रजापीता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व वीद्यालय संचालित ओमशांती शाखेत जागतीक महीला दिन हिमाचल प्रदेश मधिल सोलन येथील फीजोयोथेरपी टीचर ब्रम्हकुमारी शिला दिदी यांचे ऊपस्थीतीत व शाखेच्या संचालिका ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांचे अध्यक्षतेत सपन्न झाला.
यावेळी महीला दिनाला कीर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे कार्य करनार्या किर्तनकार ह.भ.प. सौ ज्ञानेश्वरीताई ज्ञानेश्वर भालतीलक यांचा सत्कार शाखेच्या रश्मीदिदी यांचे कडून करन्यात आला प्रथम कार्यक्रमाला अतीथी म्हनून लाभलेल्या प्राध्यापीका सौ निर्मला घुंगड सौ राऊत मॅडम ,श्रीमती मायाताई रेड्डी , श्रीमती नंदा सौदे यांनी शिवबाबाला वंदन करित दिप प्रजव्लन केले त्या नंतर महीला या देशात चुल आनी मूल सांभाळत परिवारात संस्काराचे धडे देत देशाच्या जळन घळनित महत्वाच्या भूमीका बजावत आहेत , पुरूषाच्या खांद्यांला खादां लावत सर्वच क्षेञात आपला ठसा ऊमटवत आहेत हे महीलांनी दाखवुन दिले आहे. तसेच शाखेतील वीद्यार्थीनी असलेल्या आदीवासी महीला असल्या तरी त्यानी समाजाला शिक्षनाचे दालनातुन मूख्य प्रवाहात आनून राष्टाला अभीप्रेत कार्याच्या माध्यमातुन राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू ह्या आजच्या घडीला देशाच्या ऊच्च पदाला पोहचल्या आहेत सत्कारमूर्ती ह्यानी सूद्दा महीला दिनाचे महत्व सांगत माॅ जिजाऊ, शिक्षन सम्राज्ञी सावित्रीबाईचा आजच्या स्त्रियांनी आदर्श घेत आपल्या भूमीका साकाराव्या असे सागींतले . सौ घुंगड मॅडम ,सौ राऊत मॅडम यांनी सूद्दा महिलादिनाला अनूसरुन आपले विचार मांडले . सदर कार्यक्रमाचे स्वागत बहारदार गिताने करत श्रीमती रेड्डी मॅडम यांनी सचांलन केले आभार प्रदर्शन नंदा सौदे यांनी केले मंदा फोप्से , जानकी मामनकर, चंदाताई , सौ तारापुरे, सौ पिंजरकर , श्रिमती ईलरकर ,सौ डांगेताई ,सौ येऊलताई , सौ रेखातेताई , सौ अनिता नेवारे, श्रिमती अढियाताई , ज्योत्सनाताई संतोष शर्मा, गजानन येऊल , देविदास ईखार यांचे सहकार्याने जागतीक महीला दिन साजरा केला.



