बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हिंगणा (कवठळ) येथे संगीतमय भागवत महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहचा भव्य शुभारंभ…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ८ एप्रिल २०२६
१३ एप्रिल २०२६, सोमवार हिंगणा (कवठळ) ता. संग्रामपुर जि. बुलडाणा येथील हनुमान मंदिरात गुरुवर्य ह.भ.प. श्री तुकाराम महाराज, सखारामपूरकर यांच्या प्रेरणेने संगीतमय भागवत महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. भागवत प्रेमींना आध्यात्मिक आनंद घेण्याची संधी देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजकांनी सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याची खास विनंती केली आहे.
कथाकार: ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज कळंबेश्वर व्यासपीठ: ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज कचेश्वर
दैनंदिन कार्यक्रम:
सकाळी ५–६: काकडा आरती
सकाळी ८–११ व दुपारी ३–५: श्रीमद् भागवत कथा सायंकाळी ६–७: हरिपाठ
रात्री ८–१०.३०: हरिकिर्तन
दैनंदिन किर्तनकार व कार्यक्रम तालिका
१३/०४/२०२६ सोमवार
ह.भ.प. श्री आकाश महाराज दहिगांव
१४/०४/२०२६ मंगळवार
ह.भ.प. श्री हरिओम महाराज धानोरा
१५/०४/२०२६ बुधवार
ह.भ.प. श्री महादेव महाराज सखारामपूर
१६/०४/२०२६ गुरुवार
ह.भ.प. श्री संतोष महाराज कारंजा
१७/०४/२०२६ शुक्रवार
ह.भ.प. प्रज्वली दिदी कवठळ
१८/०४/२०२६ शनिवार
ह.भ.प. श्री धनंजय महाराज सखारामपूर
१९/०४/२०२६ रविवार
भव्य मिरवणूक सोहळा २०/०४/२०२६
सोमवार ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज यांचे काल्याचे किर्तन ९:०० वा.
मृदंगाचार्य: श्री ज्ञानेश्वर महाराज कोल्हे
विनेकरी: श्री भास्कर गाळकर वरवट (खंडेराव) गायनाचार्य: श्री हरिओम महाराज, श्री मोहन हिवाळे, श्री आकाश महाराज टाळकरी: सावळी, भोन, कळमखेड, कवठळ, टाकळेश्वर, चॉडी, हिंगणा तसेच सर्व भजनी मंडळी
महाप्रसाद सर्व उपस्थितांसाठी
आयोजकांचा संदेश “संगीतमय भागवत महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व गावकरी आणि भागवत भक्तांनी उपस्थित राहावे,” असे आयोजकांनी विनंती केली आहे…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button