मुक्ताईनगर न्यायालयातमध्यस्थी विषयावर कायदेविषयक शिबिर, रक्तदान व वृक्षारोपण…

सविस्तर वृत्त असे की
दि.२३/०७/२०२५ वार बुधवार रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई , व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती मुक्ताईनगर व अधिवक्ता संघ मुक्ताईनगर यांचे संयुक्त विद्यमाने न्यायालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये “मध्यस्थी” विषयावर कायदेविषयक शिबिर, वृक्षारोपण तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम पार पडले. सदर कार्यक्रमास पी. एच. बनसोड सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव हे उपस्थित होते. यावेळी एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरचे रक्त हे संकलनासाठी शासकीय मेडिकल कॉलेज जळगाव येथे ठेवण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात मुक्ताईनगर येथील वकील संघातील सदस्य, पोलीस अधिकारी व कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी तसेच पक्षकारांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिरास शासकीय मेडिकल कॉलेज जळगाव येथील डॉ. श्रद्धा गायगोळ डॉ. अनुष्का सोनार, ब्लड बँक टेक्निशियन सागर पाटील, दीपक फोनमाने, पी.आर.ओ प्रदीप पाडवी, ब्रदर अक्षय दोंडगे, अटेंडंट प्रभाकर पाटील हे शासकीय मेडिकल कॉलेज जळगाव तर्फे उपस्थित होते. यावेळी डॉ. राणे यांनी सुद्धा सदर रक्तदान शिबिरास भेट दिली. वृक्षारोपण करिता म.उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर व वनविभाग मुक्ताईनगर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. यावेळी आंबा,पिंपळ,कडूबदाम आवळा इत्यादी वृक्षांचे वृक्षारोपण मुक्ताईनगर न्यायालयीन परिसरात करण्यात आले.
न्यायालयात दुपारी २ वा. मध्यस्थी या विषयावर कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पी.एच. बनसोड सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव व बी.जी पवार दिवाणी न्यायाधीश कस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुक्ताईनगर यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.पाटील पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, एस.बी.जानोरे मुख्याधिकारी नगरपंचायत मुक्ताईनगर, डॉ. वाय पि.राणे, डॉ. श्रद्धा गायकोळ, डॉ. अनुष्का सोनार, आर.व्ही. जोगी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मुक्ताईनगर हे उपस्थित होते. सदर शिबिरास प्रमुख वक्ते म्हणून श्रद्धा गायगोळ यांनी रक्तदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले, वकील एल.एन. पुजारी यांनी मध्यस्थी या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संतोष टि.कोळी यांनी केले तसेच प्रस्तावना व आभार हे वकील विनोद एस.इंगळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास सहाय्यक सरकारी अभियोक्ता संतोष कुमार काळंत्री, मुक्ताईनगर वकील संघाचे अध्यक्ष अरुण कांडेलकर, वकील संघातील सदस्य, संतोष कुमार टावरी, अरविंद गोसावी, पी.एल.पाटील, सहदेव तायडे, संतोष इंगळे, टी.एस.पटेल, देविदास काळे, अशोक बोदडे, देवेंद्र बोदडे, उमेश जवरे, नीरज पाटील, कुणाल गवई, राहुल लहासे, राहुल पाटील, सचिन सुरवाडे, अखलाख शहा, जगदीश निकम, धिरज पानपाटील, रुपेश वानखेडे, आकाश इंगळे, शैलेश वानखेडे, रुपाली वानखेडे, सुजाता इंगळे, रागिनी बोदडे
मुक्ताईनगर न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक किशोर एस.पिंगाणे, सहाय्यक अधीक्षक गणेश सावळे, न्यायालयीन कर्मचारी एस.बी.बाविस्कर, संजीव मानकर, लिलाधर भालेराव, किशोर भारुडे, एम.आर.शिंदे, विलास जावळे, कुणाल वाघ, बेलीफ अजय कोळी, सुनील पाटील, व्ही.बी.बारी, न्यायालयातील शिपाई वंदना निकम, सुरेश बैसाणे, तुषार निंबाळकर, संगणक कर्मचारी संगीता पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.



