मुक्ताईनगरला जुन्या बसेस का ? नेमकी हुकूमशाही कुणाची ?

प्रतिनिधी:- मुक्ताईनगर प्रमोद सौंदले
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून मुक्ताईनगर आगार येथे नवीन बसेस मिळालेल्या नाही तरी मुक्ताईनगर येथील प्रवासी हे प्रवासी नाहीत का? असे सर्वसामान्य लोकांचे चर्चेला उधान मुक्ताईनगर मध्ये दोन आमदार एक खासदार असून देखील अशी दुर्दैवी अवस्था नागरिकांचे झालेली आहे. येथील बस स्थानक हे पूर्णपणे शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघितला जात असतो आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक घेण्यासाठी पूर्णपणे बस वरती अवलंबून आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास व वेळेत पोहोचवण्याचे काम अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आद्य कर्तव्य चालक वाहक आहेत. परंतु मुक्ताईनगर येथील आगार प्रमुख प्रभारी देशपांडे यांनी नवीन बसेस साठी अजून पर्यंत कुठलेही प्रयत्न केलेले दिसून येत नाही. मुक्ताईनगर येथून संपूर्ण 143 फेऱ्या असतात आणि ह्या फेऱ्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी भगवान जगनोरे यांचे देखील दुर्लक्ष झालेला आहे. कागद रंगला म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालते असे लोकांचे जे म्हणणे आहे ते योग्य असे वाटते कुठेतरी असं सर्वसामान्य नागरिकांचा आज रोजी आरोप मुक्ताईनगर आगार प्रमुख यांच्यावरती दिसून येत आहे



