महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
अहमदनगर
मा.नामदार देवेन्द्रजी फडणवीसमुख्य मंत्री महोदय,महाराष्ट्र राज्यविषय :- आरक्षणातील उपवर्गिकरण लागु होते बाबतसंदर्भ :-१) ऑगस्ट २०२४ आरक्षण उपवर्गिकरण सुप्रीम कोर्टाची ने दिलेला निकाल२)१५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेली न्यायमुर्ती मा.अनंत बदर समिती३) ५ मार्च २०२५ चा उपेक्षित मातंग समाजाचा मांगवीर महामोर्चामहोदय,उपरोक्त संदर्भात व्दारे आम्ही आपणास विनंती करीत आहोत. आरक्षणातील उपवर्गिकरणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे.


५ मार्च २०२५ रोजी उपेक्षित मातंग समाजाचा मांगवीर हा महा मोर्चा आझाद मैदानावर निघाला होता.मोर्चास महाराष्ट्र शासनाच्या मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे वतीने मा.नामदार गिरिशजी महाजन तसेच समाजाचे वतीने मा.सुनिलजी कांबळे विधान सभा सदस्य मा.अमितजी गोरखे विधान परिषद सदस्य हे मोर्चाला सामोरे आले होते.आपण मोर्चातील समाज बांधवांना आरक्षण उपवर्गिकरणाच्या अमंलबजावणी बाबत आश्वासित केले होते.
युती शासनाचे आश्वासन हे दगडावरची रेघ हे आजवरच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीतुन आम्हाला दिलासा देणारे वाटले.
देशात अनेक राज्यात आरक्षण वर्गिकरणाची अंमलबजावणी झाली.तशीच महाराष्ट्र शासनात तात्काळ लागु व्हावी.हि विनंती
आरक्षण उपवर्गिकरणाची उपेक्षित मातंग समाजाच्या विकासासाठी किती आवश्यक आहे हे महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशा पुर्वीच मान्य केले होते.
१)१९५६ घ्या कंपनी कायद्या नुसार १० जुलै १९७८ रोजी महात्मा फुले अर्थीक विकास महामंडळाची स्थापना अनुसुचित जातीच्या ५९ जातीसाठी केली होती.परंतु या महामंडळा व्दारे उपेक्षित मातंग समाजास योग्य अर्थीक लाभ मिळत नाही.हि जाणिव झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ११ जुलै १९८५ रोजी लोकशाहिर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली.त्यातुन काही अंशी अर्थीक कर्ज पुरवठा उपेक्षित मातंग समाजाला होऊ लागला.
२)२२ डिसेंबर १९७८ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) स्थापना ५९ जातीसाठी झाली.परंतु त्या व्दारे मातंग समाजातील युवकांना त्याचा योग्य प्रमाणात सामाजिक न्याय मिळत नाही.असे सामाजिक संशोधनाव्दारे दिसुन आल्याने महाराष्ट्र शासनाने ११जुलै २०२४ रोजी अनुसुचित जाती अंतर्गत मातंग तत्सम जाती
(मांग,मातंग,मिनुमादीग,दखनी- मांग,मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग,मांग गारुडी मादगी मादीगा) या समाजाच्या विकासासाठी (आर्टी) आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केली.या संस्थेद्वारे मातंग समाजातील युवकांचा
संशोधनातुन विकास होईल. परंतु उच्च शालेय शिक्षण तसेच नोकरी यासाठी मेरीट प्रक्रितुन होणारी टक्केवारी निवड यासाठी आवश्यक असते तो शासकिय लाभ मिळत नाही.त्यामुळे आरक्षणातील उपवर्गिकरण व त्याची टक्केवारी होणे हि या समाजाचे विकासासाठी काळाची गरज आहे.
अस्पृश्यतेतील अती उपेक्षित असा समाज हा कलंक घेऊन आम्ही जगतो.हा कलंक हा अती उपेक्षितपणा आमचा दुर होऊ शकतो.
३)१ऑगस्ट २००३ मध्ये आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे आयोगाची स्थापना झाली त्यातील ८५ शिफारशी पैकी ६५ शिफारशी शासनाने स्विकारल्या परंतु अद्याप अंमलबजावणी झाली नाही.
महाराष्ट्र शासनाने या समाजाचा उपेक्षितपणा दुर करण्यासाठी वेळोवेळी सहानुभूतीने पाऊले उचलली परंतु त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही.परिणामी टक्केवरीत लाभ मिळत नाही वरील बाबी वरुन अनुसुचित जातीमधील ५९जाती पैकी मांग समाज हा अति उपेक्षित आहे हे शासनाला मान्य झाले आहे.
मातंग समाजाची शालेय शैक्षणिक क्षेत्रातील निवड, टक्केवारी व्दारे होणारी निवड तसेच शासकिय नोकरी व्यवसातील निवड राजकारणातील प्रतिनिधित्व नगण्य टक्केवारी आहे. शासनाच्या विविध योजना याबाबत ससे होलपट होत असल्याने अनुसुचित जातीतील १३ टक्के आरक्षणातील १ टक्का हि लाभ मिळत नाही. हि वास्तवता शासकिय आकडेवारी वरुन शासन देखील नाकारु शकत नाही.
शासनाने अर्थीक महामंडळातुन केलेले वर्गीकरण संशोधन प्रशिक्षण यात केलेले वर्गीकरण आयोगाची नियुक्ती हि काळाची गरज ओळखुन घेतलेले निर्णय यावरुन मातंग समाजाचा इंपिरियल डाटा आधीच महाराष्ट्र शासनाकडे असल्याने.मातंग समाजाची आजवर झालेली अवहेलना १९६१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा आधार घेऊन आरक्षण उपवर्गिकरणाचा निर्णय घेऊन किमान काही राज्यातील उपवर्गिकरणाची टक्केवारी पाहता ५० ते ४५ टक्क्यात उपवर्गिकरण करून न्याय द्यावा.
मातंग समाजाचा वर्तमानातील उपेक्षितपणा,भविष्यातील विकास व भुतकाळातील अनुशेष यांचा विचार करता ५०टक्के आरक्षणाच्या उपवर्गिकरणाचा लाभ दिला तरच मातंग समाजाची प्रगती होऊन महाराष्ट्र शासनातील अती उपेक्षित जात हा कलंक मिटु शकतो.
आरक्षण उपवर्गिकरण तात्काळ व्हावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.
१)मांगवीर मोर्चा समिती (संघटन)
२) सकल मातंग समाज (मार्गदर्शक)
शब्दांकन आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता



