महाराष्ट्रमुबई

माझ्या पोटी नको येऊ बापा!

तुम्ही दहा दिवस परगावी गेले, यात्रेला गेले तर मित्र भेटत नाहीत.सहसा बोलत नाहीत.तसे समजून राहा.
माणसे भेटतात,बरे वाटत असावे.पण माणसे सोबत आजार घेऊन येतात.आजारी माणसाला लवकर बाधा होते.म्हणून डॉक्टर दवाखान्यात पेशंटला भेटू देत नाहीत.रागावतात.तिच शिस्त तुम्ही घरी पाळा.
आता जळगाव शहरात डोळे येण्याची साथ चालू आहे.कोण तुम्हाला आजार देऊन जाईल,कळणार ही नाही.
मी किंवा आणखी कोणी चार मित्र तुमच्या कडे चार वेळा आलो तर तुमच्या आजार वर चांगला प्ररिणाम होणार नाही.उलट त्रास होण्याची शक्यता जास्त.हे तर डॉक्टर सांगतात.
आजारी माणसाला जो भेटीला येतो,तो फक्त देखावा असतो.खरे म्हणजे स्वताचा काहीतरी समज किंवा गैरसमज असतो.मी गेलो होतो.हं!असे सांगायला मोठेपण वाटते,त्याला.आणि कधी कधी पेशंटला.मला इतके इतके लोक भेटून गेले.मी खूप महत्वाचा माणूस आहे.मी मेलो तर यांचा कारभार ठप्प होईल.महानगरपालिका बंद पडेल.असा आपला भ्रम असतो.असा भ्रम ठेवू नये.
कधी कधी आजारपणात जास्त मित्र भेटायला आले तर बायकोला पोरांना मिजाज दाखवता येतो.बघ,किती लोक आले?कळले का?मी किती महत्वाचा माणूस आहे?आणि तुम्हाला माझे महत्त्व कळत नाही.आता तरी कळले का?
जळगाव मधील एका महापौर ची पत्नी जेलमधे होती.घरकुल घोटाळा होता.तर महानगरपालिकेचा एक रिटायर्ड कर्मचारी त्यांना भेटायला गेला होता.वरून विचारले सुद्धा!”तुमची बायको जेलमधे आहे.तर आता कसे वाटते?”असे विचारल्यावर महापौर ला आनंद झाला की दुःख? विचारणाऱ्याला आनंद वाटला की दुःख?
या प्रश्नांची उत्तरे, स्पष्टीकरण कोणी कसे ही देईल.पण प्रसंग पाहून कळते की, दुःख कोणाला झाले? आनंद कोणाला झाला?खरे म्हणजे,विचारणाऱ्याने या संधीचा गैरफायदा घेतला.जखमेवर मीठ चोळले.म्हणे, त्यांनी सुद्धा माझ्या जखमेची नखाने खलफी काढली होती.
आपण आजारी असताना अशीही माणसे मुद्दाम भेटीला येतात.आपण जेलमधे असतांना अशी माणसे मुद्दाम भेटीला येतात.आपला पोरगा जेलमधे गेला तर अशी माणसे मुद्दाम भेटीला येतात.काळजी करू नका.मी आहे मदतीला.असेही सांगतात.
आपण ज्यांना त्रास देतो.छळ करतो.शोषण करतो.गैरफायदा घेतो.बदनामी करतो.ती माणसें आपण ओळखतो.ती माणसे नारळ पाणी सुद्धा घेऊन येतात.घ्या ,हे शेवटचे समजून तरी घ्या. तर समजावे,हिच माणसे नेरी नाक्यावर सर्वात आधी पोहचणार आहेत.पोहचवणाऱ्यांचे स्वागत करणार आहेत.
ज्याचा जन्मदाता बाप मेला.तो नेरी नाक्यावर घेऊन तर आला.रडत रडत आला.वरवर वाटले की,हा दुःखी झाला असावा.पण आत खोलवर दिसले की,तो बोझमुक्त झाला होता.मनातल्या मनात बोलत होता.” खूप त्रास भोगला आम्ही.जिणे हराम केले होते.कोणाला चहाला घरी बोलवावेसे वाटेना.शिवाय ना घर विकता येत होते,ना शेत विकता येत होते.बॅंकेत पैसे असूनही देत नव्हते.चला गेले ते!देवा, परमेश्वरा,तू सांभाळ पुढे.हिच प्रार्थना “.म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतो, “परमेश्वर, त्यांच्या आत्म्याला शांती देवो!”म्हणजे , पोहचले तेथेच पडून राहा.माझ्या पोटी नको येऊ बापा !

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button