स्टार भारत चैनल ला लागलेल्या बातमीची दखल,माळेगाव बाजार बस स्टॅन्ड वरील रोडच्या आजूबाजूच्या नाली बांधकामाला सुरुवात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार मेन रोड परिसरातील नालीचे बांधकामाला सुरवात पावसाळ्यात पाण्याचा निचरा बाधित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका. निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
माळेगाव येथील रहिवासी व व्यापारी यांनी मेन रोडवरील नाली बांधकामाची तक्रार द्यायच्या अगोदर बस स्टॅन्ड वरील रोडच्या आजूबाजूच्या नालीचे प्रश्न बस स्टँड वरील दुकानदार व व्यापारी वर्ग यांना पडला होता
पावसाळा सुरु झाल्यानंतर रोडवरील पावसाचे पाणी रोडच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाण्याची शक्यता होती. हे काम असेच ठप्प राहिल्यास पाण्याचा निचरा अडथळित होऊन हे पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये साचण्याची शक्यता होती . त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकला असता. माळेगाव बाजार येथील बस स्टँड वरील रोडच्या आजूबाजूच्या
नालीच्या बांधकामांची संबंधित ठेकेदारांनी तातडीने नोंद घेऊन माळेगाव बाजार येथील व्यापारी वर्ग हा रस्त्यावरउतरण्या अगोदरच या कामाची चौकशी करून कामाला सुरुवात केली. ठेकेदाराने आपल्यावर कोणतीही कारवाई न होण्याकरिता कामाला सुरुवात केली.



