महाराष्ट्रविदर्भ

मालेगाव तालुक्यात हातभट्टीवर पोलिसांची धडक कारवाई !

;४६ हजारांचा मुद्देमाल जप्त…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – तालुक्यातील मेडशी-वाकलवाडी रस्त्यावर पोलिसांनी हातभट्टीच्या अवैध धंद्यावर धडक कारवाई करत तब्बल ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी गजानन सुधीर साठे,राहणार मेडशी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली त्याच्या ताब्यातून विविध प्रकारच्या अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनार्थ पीएसआय रवी सैबेवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली त्यात हेड कॉन्स्टेबल सुनील पवार,शिवाजी काळे,पोलीस कॉन्स्टेबल जितू पाटील,अमोल पवार,गणेश मेटांगळे अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असून सदर कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळ अवैध दारू निर्मिती आणि विक्रीस मोठ्या प्रमाणातआळा घालण्यात मालेगाव पोलिसांना यश आले मेडशी व आसपासच्या परिसरात हातभट्टीमुळे अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या पोलिसांनी घेतलेल्या तातडीच्या कारवाईने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्याचे सदर माध्यमातून पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कठोर उपाययोजना राबवून समाजहिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्यामुळे परत एकदा पोलिसात प्रतिबिंब जनतेत उंचावले गेल्याचेबोलले जाते..

प्रतिक्रिया बॉक्स
मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मते या अवैध्य दारूभट्टीमुळे अनेक संसाराची राख रांगोळी झाली आहे नवीन पिढीचा जास्त प्रमाणात या कडे कल वाढल्यामुळे याचे समाजात प्रतिबिंब वेगळेच तयार होत आहेत त्यामुळे वेळीच आळा घालने सर्वप्रथम महत्त्वाचे आहे त्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे हे नागरिकाचे प्रथम कर्तव्य असे सांगण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button