जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

मुक्ताईनगर येथे गुटखा जप्त; ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त


मुक्ताईनगर प्रतिनिधी

दि. २६ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातून सुमारे ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा साठा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा वर्डा जवळ सावं. रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत अनिकेत शिवाजी सुरवसे (वय ३५, रा. सावरगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील वाहनातून २,४३,३६० रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व V-1 तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ४ लाख रुपये किमतीचे MH-14/DX-1463 क्रमांकाचे वाहन आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ६,४८,३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या पथकाने केली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button