जळगावा जिल्हामुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यात आज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद

मुक्ताईनगर –
१३२ केव्ही मुक्ताईनगर उपकेंद्र तसेच १३२ केव्ही करकी / पूर्णा उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ३३ केव्ही वीज लाईन आज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या वीज बंदमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कुठ्ठा, वडोदा वगळता उर्वरित सर्व गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित राहणार आहे.
वीज यंत्रणेमध्ये आवश्यक तांत्रिक कामकाज / देखभाल दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे हा तात्पुरता वीज बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या कालावधीत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, घरगुती तसेच व्यावसायिक कामांचे नियोजन करून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



