बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ता विकासाला प्राधान्य -आ.राजेश एकडेनांदुरा(प्रतीनीधी)

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याकरता रस्ता विकास हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे रस्ता विकासाला प्राधान्य दिले असून निवडणुकीच्या वेळी मलकापूर मतदारसंघाचा कायापालट करून दाखवेल असे मी जनतेला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असून मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन आ. राजेश एकडे यांनी ६ जुन रोजी नायगाव येथील रस्ता डांबरीकरण भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी केले.
गेल्या साडे तीन वर्षापासून आ. राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्नातून मलकापूर विधानसभा मतदारसंघात कामांचे भूमिपूजन वा लोकार्पण ही कामे वेगात सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून ६ जुन रोजी मौजे नायगाव ता.नांदुरा येथे रस्ता डांबरीकरण ,मौजे काटी ता.नांदुरा येथे मातोश्री पांदन शेत रस्ता बांधकाम ,मौजे वडगाव डिघी ता.नांदुरा येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम ह्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आ. राजेश पंडीतराव एकडे यांचे हस्ते संपन्न झाला.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधीकारी , कार्यकर्ते व नायगाव ,काटी , वडगाव डिघी येथील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button