कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान द्याकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेस मैदानात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी
अकोट दि.5. वर्ष 2023 च्या एप्रिल महिन्यात झालेल्या अति पाऊस व गारपिटीमुळे अकोट तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानात सापडला आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विक्री 50,000रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी अकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा .उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदना मार्फत करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हिदायक पटेल ,अकोला जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, अकोट तालुकाध्यक्ष अनोख राहणे यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले ,या निवेदनामध्ये अकोट तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाचे वर्णन सविस्तरपणे करण्यात आले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना शासन निर्णय पूर्णता त्यांना दुर्लक्षित करताना दिसते आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा छळ तात्काळ थांबवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट विक्री 50,000 हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने सदर निवेदनात केली .सदर निवेदनावर काँग्रेस



