जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

तेल्हारा शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताची पहिल्या महिला पंतप्रधान ,आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांची १०६ वी जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा

दि.१९ : – आज रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी तेल्हारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरामध्ये देशाच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान ,आयर्न लेडी स्व.इंदिरा गांधी यांची १०६ वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम अग्रसेन महाराज टावर चौक ,तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हारार्पन, पूजन करण्यात आले, आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत त्यांना अभिवादन केले. स्व. इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ साली झाला असून आज त्यांची १०६ वि जयंती संपूर्ण स्तरावर साजरी करण्यात येत आहे १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडून गेल्या. स्व. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत .इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तात्कालीन राजकीय नेतृत्व करणाऱ्या पुरुषांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या आयर्न लेडी स्व इंदिरा गांधी यांनी करून दाखवल्या. बाहेरून त्या कणखर असल्या तरी त्या आतुन तितक्याच भावनाप्रधान होत्या. राग ,प्रेम ,लोभ अशा सर्वच भावना त्यांच्या आयुष्याचा भाग होत्या, अशा या महान व्यक्तींची आज जयंती, आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांच्या नावाचा जयघोष करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन तेल्हारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीपभाऊ खारोडे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाकरिता काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button