शेगाव ग्रामीण परिसरात वाढले डेंगू चे रुग्ण आरोग्य जिल्हाधिकारी डॉ अमोल गीते यांच्याकडून शेगाव ग्रामीण भागात सौरक्षण करण्यात आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
: शेगाव तालुक्यातील ग्रामीण परिसरात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गायगाव लासुरा कनारखेड चिंचोली सुवर्णा शिरजगाव नागझरी टाकळी या व इतर शेगाव तालुक्यातील इतर परिसरात डेंग्यू जास्त रुग्ण आढळले असून ताप, सर्दी, खोकला, पेशी कमी होणे, हातपाय दुखणे यासारख्या विविध आजारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मोहीम राबवण्यात येत आहे 18 नोव्हेंबर शनिवार पासून सुरू करण्यात आली आहे लिव्हर क्लिनिक व कीटकनाशक विषयी ग्रामीण भागातील घराचे संरक्षण कसे करायचे याविषयी माहिती देण्यात आली संरक्षण करण्याविषयी घरातील मोठी भांडी राजन पाण्याची टाकी हऊद आठवड्यातून एक वेळेस स्वच्छ साफ करून एक दिवस कोरडे दिवस पाडण्यात यावा असे आरोग्य विभागामार्फत शेगाव ग्रामीण भागामध्ये माहिती देण्यात आली यावेळी आरोग्य विभागामार्फत खंडारे सर धनराज बघे सर पांडे सर एन जी चव्हाण आरोग्य सेवक आरोग्य डॉ पद्मामासे मॅडम घोंगे सर यावेळी तालुक्यातील आशा रेखा सुलताने संगीता गवई वंदना हिवराळे शेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाच्या टीमने आरोग्य संबंधित संरक्षण करण्यात मार्गदर्शन करण्यात आले
@ग्रामपंचायतने खबरदारी म्हणून गावात धूर फवारणी करावी अशी माहिती आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतला कळविण्यात आले असून गावातील डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेगाव तालुक्यातील ग्रामीण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी यांनी आपल्या गावामध्ये व वार्डामध्ये पुढाकार घेऊन गावात धूर फवारणी करावी व लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्दी, ताप, टायफाइड, डेंग्यू यासारखे आजार डोकेवर काढत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायत त्यांना देण्यात आली

आरोग्य सहाय्यक
एन जी चव्हाण



