मालेगाव नगर पंचायतकडून नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची मालिका…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यात जिल्हा आणि मतदारसंघ स्तरावर हे उपक्रम राबविले जाणार असून,या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांच्या सक्रीय सहभागातून लोकशाही प्रक्रियेला बळकट करणे आहे. मालेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत असून, त्यांनी नागरिकांनी मतदान हक्काचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने मतदान करावे,असे आवाहन केले आहे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी मालेगाव शहरात मतदार शपथ सोहळा,फ्लॅश मॉब आणि विजय उपक्रमाच्या उद्घाटनाने या जनजागृती मोहिमेची सुरूवात झाली मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या उपस्थितीत नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे वचन दिले त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”मतदान हा केवळ हक्क नसून,तो आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी एक जबाबदारी आहे प्रत्येक मताचा किंमतीचा वापर राष्ट्रनिर्माणासाठी व्हावा.”मतदान जनजागृतीसाठी नगरपंचायतीने पुढील उपक्रमांचे नियोजन केले आहे संगोळी,पथनाट्य,मतदार जागृतीविषयक स्पर्धा,मानवी साखळी आदी उपक्रमांतून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे विद्यार्थ्यांमार्फत पालकांसाठी पत्रलेखन व संकल्पपत्रे पाठवून, पालकांनी मताधिकाराचा वापर करावा असा संदेश दिला जाणार आहे याचसोबत तरुणाईला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मॅरेथॉन,पायी रॅली (वॉकेथॉन),सायकल रॅली,बाईक रॅली यांसारखे आकर्षक उपक्रम राबविण्यात येणार आहेत मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या पुढाकाराने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी वोटर अवेरनेस फोरमच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे,ज्याद्वारे कामगारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल नगरपंचायतीच्या वतीने शहरभर घरोघरी भेटी देऊन नागरिकांना मत देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम होणार आहे नागरिकांनी आपले मतदान केंद्र,मतदान प्रक्रिया याविषयी आवश्यक माहिती मिळवावी यासाठी माहितीपत्रके वाटण्यात येतील आणि विशेष मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या या सशक्त प्रयत्नांमुळे मालेगावातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढून,आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक नागरिक मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



