अपंग व वृध्द मतदारांनी मतदानाचा बजावला हक्क.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – निवडणूकी संबंधित अधिकारी वर्गाने अमानी सह खेडो पाडी जाऊन पात्र असलेल्या अपंग व वृध्द मतदारांनाच्या घरी जाऊन मतदान करून घेतले
20 नोहेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोड विधानसभा मतदारसंघा तील अमानी सह मसला खुर्द, खडकी इजारा व जामंभरून वाडी येथील पात्र असलेल्या अपंग व वृध्द मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. जे मतदार मतदान केंद्रावर जावून मतदान करू शकत नाही असे व ज्यांनी त्यासाठी आवश्यक ते आपले फार्म भरून दिले होते अश्या पात्र असलेल्या अपंग व वृध्द मतदारांनी आप आपल्या घरीच मतदानाचा हक्क बजावून मतदान केले अमानी येथे 7 मतदार होते या मध्ये अपंग व्यक्ती म्हणून त्र्यंबक गवळी, अवचार, लठाड, व वृध्द मतदारा मध्ये बापूराव गवळी, बबनराव गवळी, अंभोरे तर मसलाखृर्द येथील 8 आणि खडकी इजारा येथील 7 व जाभंरून वाडी येथील 1 अश्या अपंग व वृध्द मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या साठी मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेले शेखर , इढोले, ज्ञानदेव उगले (पोलिस), सावजी, महल्ले (पटवारी) अमानी, बिएलऒ खंडारे व केळे अमानी, यांनी निवडणूक साहित्य घेऊन मतदाराच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले आहे.



