सामाजिक

ब्रेकिंग २४ तासांत पुन्हा बदलले बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी! शुभम गुप्ता नवे सीईओ

स्टार भारत लाईव्ह
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा):२४ तासांत बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्यात आले आहेत. काल रात्री विशाल नरवाडे यांची बदली करून त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याला २४ तास उलटत नाही तोच राज्य सरकारने त्यात अशंत: बदल करून शुभम गुप्ता यांची बुलढाणा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आज२० मार्चला सामान्य प्रशासन विभागाने त्यासंबंधीचे आधीच आदेश केले आहेत. आदेशावर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नितीन गर्दे यांची स्वाक्षरी आहे.
हा तडकाफडकी बदल का केला? याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button