
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
29 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार १७ वर्षीय तरुणी घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना शेगाव-कालखेड दरम्यान शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सदर घटनास्थळी मुलीचा मृत्यू होताच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने रोडच्या मधोमध रेती खाली करून घटनास्थळावरून पळ काढला
शेगाव तालुक्यात पूर्णा नदी मन नदी व काही छोट्या नद्या यामधून दरवर्षी करोडो रुपयांचे गौण खनिज उत्खनन अवैद्यरीत्या केले जाते
सदर प्रकरणाचा बातम्या शेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या विरोधात अनेक वेळा छापल्या गेल्या परंतु अद्यापही शेगाव प्रशासनाने अवैध्य रीतीवर कठोर कारवाई केली नाही यामध्ये रेती वाहतूक करणाऱ्या मालकांकडून हप्ते वसुली केल्या जात असल्याची चर्चा ही दरवर्षीच असते परंतु यामध्ये काही गाड्या ह्या राजकीय पुढार्यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचेही चर्चा आहे त्यामुळे काही गाड्या बिनधास्त रोडवर चालतात तर काही गाड्या ह्या चोरट्या पद्धतीने अवैध्य रेती वाहतूक करतात त्यामुळे अशी वाहतूक करताना ड्रायव्हर हे पूर्णा नदीपासून ते शेगाव पर्यंत जवळपास 15 ते 20 किलोमीटरच्या अंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये क्रॉस करतात त्यामुळे या गाड्यांची स्पीड एवढी असते की यांच्या हवेने सुद्धा मोटर सायकल दोन फूट दूर लोटला जातो परंतु या अति स्पीडला शेगाव ट्राफिक पोलीस प्रशासन तसेच तहसीलचे प्रशासन अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे परंतु यामध्ये नाहक निष्पाप जीवांचा बळी जात आहे
शेगाव शहर व ग्रामीण पोलीस मोटरसायकल चालकांना किरकोळ कारणावरून दंड देतात परंतु दोन दोन ब्रांसचे अवैद्य वाहतूक करणारे रेती टिप्पर बिनधास्तपणे विना नंबर प्लेट रोड चालतात त्यावेळेस मात्र येथील पोलीस कर्मचारी व तहसील कर्मचारी या टिप्परच्या चालकांना अर्थपूर्ण सलाम करतात परंतु दंड ठोकत नाहीत अशीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये दिसून येत आहे
सदर एरियामध्ये कार्यरत असलेले पटवारी मंडळ अधिकारी गाव पातळीवरील ग्रामसचिव पोलीस पाटील समित्या ह्या सुद्धा अर्थपूर्ण काला डोळा करत असल्याचे चित्र तालुक्यांमध्ये सर्रास दिसत आहे त्यामुळे शेगाव पोलीस प्रशासन तसेच तहसील प्रशासनाने एक तर पूर्णपणे अवैध्य वाहतुकीच्या गाड्या ह्या नंबर प्लेट लावून चालू द्याव्यात अन्यथा कोणतीही गाडी रोडवर चालू देऊ नये अशा चर्चा तालुक्यातील नागरिक करत आहेत
आतापर्यंत शेकडो नागरिकांचे जीव अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे गेलेले आहेत त्यामुळे निष्पाप जीवांचा जात असलेला बळी वाचवण्यासाठी सामान्य जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन शेगाव पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाला विना नंबर प्लेट अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफिया वर कडक कारवाई चे निर्देश द्यावे अशी मागणी शेगाव तालुक्यातील संतप्त जनतेकडून करण्यात येत आहे
कोड
शिवसेना तालुकाप्रमुख रामेश्वर थारकर हे राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या धडाडीने कार्य करत आहेत रामेश्वर थारकर यांनी घटनास्थळी जाऊन ताबडतोब रुग्णवाहिकेला बोलावले तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा ताबडतोब माहिती देऊन सदर मृत झालेल्या मुलीला रुग्णवाहिकेत टाकण्यास मदत केली तसेच मुलीला सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात घेऊन गेले तालुक्यात कोणत्याही ठिकाणी घटना घडल्यास रामेश्वर थारकर हे अहोरात्र त्या ठिकाणी हजर राहतात सदर मुलीच्या अपघाताची घटना ही निर्दयी कृती असल्याने रामेश्वर थारकर यांनी सदर घटनेचा सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी तसेच शेगाव तालुक्यात चालत असलेल्या विना नंबर प्लेट गाड्या अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे



