बंधारे दुरुस्त करा,कालव्यांची स्वच्छता त्वरित करा आ. सुभाष देशमुख यांच्या सूचना

*बंधारे दुरुस्त करा,कालव्यांची स्वच्छता त्वरित करा आ. सुभाष देशमुख यांच्या सूचना
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी वैजिनाथ धेडे*जपसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक*दक्षिण सोलपूर मतदारसंघातील सिंचन कामे, पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक जपसंपदा विभागाचे अधिकाऱ्यासमेवत आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी आ.देशमुख यांनी भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्ती, कालवा स्वच्छता, प्रस्तावीत वडापूर बॅरेजसह अन्य ठिकाणचे बॅरेज, संरक्षक भिंती व घाट बांधणे, होटगी तलाव व कुडल संगमचा पर्यटनस्थळ विकास यावर प्राधान्याने चर्चा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.दक्षिण सोलपूर मतदारसंघातील भीमा व सीना नदीवर बांधण्यात आलेले को.प.बंधारे दगडी बांधकामातील आहेत. याच्या पायातून गळती होत असल्याने 34-80 स्तंभांची कामे नव्याने कॉक्रीटमध्ये करण्याची शासनाकडे मागणी केली असून त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, पाणी अडविण्यासाठी वापरात असलेले लोखंडी बर्गे गंजून खराब झाले, त्यासाठी लोखंडी बर्गे नविन पुरवठा संदर्भात आढावा घेऊन त्वरीत पुरवठा करावा, दोन्ही नद्यांच्या घाट व संरक्षक पुरसंरक्षक भिंती बांधण्याची शासनाकडे मागणी केली आहे



