
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे
तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
दि.२८: तेल्हारा येथील प्रसिद्ध श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते .
दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी संस्थे चा ध्वज मुख्य इमारतीवर प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक यांच्या हस्ते रोहण करण्यात आला .दि.२४ डिसेबर २०२३ रोजी जयंती महोत्सव निमित्याने कार्यक्रमाचे उद्घाटन अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकारी मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रम चे अध्यक्ष पदी केशवराव मेतकर साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रमुख अतिथी म्हणून श्री सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकारी मुंबई. साहेबराव सोनमाळे आजीव सदस्य,सुखराम पाटील, डॉ विलासराव भांबुरकर,रमेश पाटील कोकाटे,शोएबली मिरसाहेब, दादासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील माधवराव खोटरे, ॲड.विश्वासराव नेरकर, पुरूषोत्तम पाटील दहे, सुरेश पाटील आढे, सुधीर बापू देशमुख शामशिल भोपळे, किसनराव बोडखे, डॉ अशोकराव बिहाडे,ओंकार फाटकर, चंदकांत मोरे मुकुंद कडू, सुहासराव कराळे,एस बी पिवाल, सुभाष ढोले,यु पी विखे दिलीप सांगुनवेढे अनवर शहा बाबुजी,प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक सौ प्रेरणाताई कराळे शिक्षक प्रतिनिधी गजानन गावंडे, श्रीकांत सपकाळ, अंकेश भांबुरकर,रोहन धुंदडे विद्यार्थी प्रतिनिधी कु संस्कृती वानखडे व विद्यार्थी विद्यार्थिनी आधी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. दि.२५ डिसेंबर रोजी अकोला येथे एक सुर एक ताल दि २६ डिसेबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमात प्रा.अण्णासाहेब ढोले आजिव सदस्य, नारायण देवतळे आजीव सदस्य, दादासाहेब पाटील आजिव सदस्य, बाळासाहेब पाटील आजिव सदस्य,दि २७ डिसेबर रोजी जयंती उत्सव निमित्ताने अभिवादन सोहळा व शहरातुन भव्य दिव्य ज्ञानदिंडी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लेझीम पथक ,बॅंड पथक पालखीसह हा सोहळा आयोजीत करण्यात आला होता यावेळी परिसरातील आजिव सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी सहभागी झाले होते दि २९ डिसेंबर रोजी कार्यक्रम चे बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन खोटरे
साहेब आजिव सदस्य प्रमुख अतिथी म्हणून डॉ गोपाल ढोले प्राचार्य, बाळासाहेब पाटील, दादासाहेब पाटील, साहेबराव सोनमाळे रमेश पाटील, नारायण देवतळे ,विजय देशमुख ,सुधीर बापू देशमुख ,डॉ अशोकराव बिहाडे ,यु पी विखे, सुहासराव कराळे, दिलीप सांगुनवेढे ,सौ सविताताई खुमकर, प्रा उदय देशमुख,आदिंच्या उपस्थितीत शालांत परीक्षा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये दिपक ताथोड, पल्लवी तुंबडेसह बरेच विद्यार्थ्यी होते या कार्यक्रमाला सर्व आजिव सदस्य शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते जयंती उत्सव कार्यक्रम चे सुत्रसंचलन शांतीकुमार सावरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन अंकेश भांबुरकर यांनी मानले
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील शिक्षण, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले आहे.



