फेसबुकवरून प्रेमसंबंधातून भलतेच कृत्य घडले फोटो व व्हिडिओ व्हायरसकरण्याची धमकी देत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
प्रियकरासह त्याच्या चार मित्रांवर गुन्हा दाखल
शेगाव । पुणे येथे नोकरीसाठी असलेल्या तालुक्यातील एका मुलीसोबत फेसबुकवरील प्रेमसंबंधातून भलतेच कृत्य घडले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील एका भामट्या युवकाने तिच्यासोबत – अनैतिक संबंध प्रस्थापित केले. चोरून या कृत्याचे फोटो व व्हिडीओ काढले आणि काही दिवसांनी हेच नको त्या अवस्थेतील फोटा व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून तिचा छळ केला. लैंगिक शोषण केले. इतकेच नव्हे तर त्याने मुलीच्या वडीलांना पैशांची मागणी केली. ही खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका खेड्यातील २४ वर्षीय तरुणी नोकरीसाठी पुणे येथे गेलेली असून तेथे राहत असतांना फेसबुकवरून तिची सचिन साहेबराव जागदंडे (२८) रा.चिंचोली ता. फुलंब्री जि.छ. संभाजीनगर याच्यासोबत ओळख झाली. सचिन याने त्याच्याविषयी खोटी व मोठेपणाची माहिती देवून सदर तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांचे प्रेमसंबंध ,
, सुरू झाले. दरम्यान एका दिवशी सचिन याने
प्रेमसंबंधातून सदर तरूणीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने चोरून या गैरप्रकाराचे फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढले. मात्र काही दिवसातच सचिनने त्याचे खरे रूप दाखवायला सुरूवात केली. त्याने हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तो तिला मारहाण करू लागला. बळजबरीने तिला सोबत ठेवू लागला. हे कृत्य करण्यासाठी त्याला त्याचे चार मित्र सहकार्य करत होते. त्यांनीसूध्दा पीडित मुलीला खूप त्रास दिला. सचिन जोगदंडे हा इतके करूनच थांबला नसून त्याने पीडित मुलीला पैशांची मागणी केली तसेच त्याने पीडितेच्या वडीलांना देखील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची मागणी केली.
अनेक दिवस हे सर्व सहन केल्यानंतर अखेर याबाबत पीडितेच्या वडिलांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी याप्रकरणी सचिन साहेबराव जोगदंडे याच्यासह त्याच्या चार मित्रांवर कलम ३८३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.



