देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : तालुक्यातील गारखेडा येथील प्रिया सागर कदम (वय २०) यांचा देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) समोर आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये कायमी मर्ग क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिस नोंदीनुसार, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्यापूर्वी प्रिया कदम यांना त्यांच्या नातेवाईकांनी मयत अवस्थेत देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम सोळंके यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत एमएलसी क्रमांक २५५/२०२६ अन्वये ग्रामीण रुग्णालयाचे कक्षसेवक गजानन दत्तात्रय मुंढे यांनी देऊळगाव मही पोलीस चौकीला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक २८०/२०२६ अशी नोंद केली.
या प्रकरणाची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप यांनी केली असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहळकर करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



