गुन्हेगारी
मालेगाव पोलिसांची धडक कार्यवाही

: एकास अटक
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुंगळा येथे गावठी दारू घरीच तयार करून पाऊस मध्ये पॅकिंग करून विकणाऱ्याच्या व्यक्तीच्या घरावर आज दिनांक 3 नोव्हेंबर दुपारी 4 वाजता पोलीस उपनिरीक्षक पेटकर यांनी धाड टाकून सांडव्यासह मुद्देमाल केला जप्त
3 नोव्हेंबर दुपारी 4 वाजता मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक माधव पेठकर सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप लांडगे बक्कल नंबर 10 76,पोलीस कॉन्स्टेबल रवी खडसे बक्कल नंबर 307,यांनी मुंगळा येथील चंद्रप्रकाश सरकटे यांच्या घरावर प्रो रेट धाड टाकून 50 लिटर मोहाचा सांडवा व 35 लिटर गावठी अवैध दारू ने भरलेल्या पाऊच जप्त करून आरोपी चंद्रप्रकाश सरकटे राहणार मुंगळा यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 552/2024 नुसार कलम 65 ई 65 क मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक माधव पेठकर करीत आहे.



