रस्ता चौपदरीकरणात मुक्ताईनगर पुरनाड फाटा येथे उड्डाणपूल ऐवजी जंक्शन मंजुरी बाबत; केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली NHAI अधिकारी व बाधित नागरिकांची बैठक…

इंदोर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रा.मा.753एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मध्ये पहूर – देशगांव ह्या खंड अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे प्रस्तावित उड्डाणपूल ऐवजी स्थानिक रोजगार लक्षात घेता जंक्शन करण्यात यावे, अशी परिसरातील स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी यांची मागणी असून त्याबाबत आज केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी व संबंधित नागरिकांची बैठक घेऊन योग्यती कार्यवाही करणे बाबत सूचना केल्या. तसेच जमीन संपादनात कमी दराने पैसे मिळाल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये नाराजी असल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्याकडे तत्काळ पाठपुरावा करणे बाबत त्यांनी आश्वासन दिले.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांना जोडणाऱ्या इंदोर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रा.मा.753एल रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारतमाला योजनेंतर्गत ७८४ कोटी निधी केंद्र सरकार कडून मंजूर असून, सदर रस्त्यावर असणाऱ्या मुकताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथून उड्डाणपूल प्रस्तावित होता, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी होती. सदर ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास येथील ९० ते १०० व्यवसायीकांना रोजगारास मुकावे लागणार असून, येथे बनत असलेल्या ग्रामीण बनाना हबला सुद्धा नुकसान होणार आहे. तसेच सदर ठिकाणी जंक्शन झाल्यास स्थानिक उद्योग, व्यवसायाची वृद्धी होऊन केळी व्यापार वाहतुकीस चालना मिळणार असल्याने, सदर ठिकाणी प्रस्तावित उड्डाणपूल ऐवजी जंक्शन करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या आग्रही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



