लग्नाचे खोटे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याची तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार पिडीत युवतीने शहर पो.स्टे. ला दिली असून आरोपीने शहरातील मेनरोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन तिचेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीविरूध्द विविध
कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चांदुररेल्वे जि. अमरावती येथील पिडीत युवतीचे आर्मीत नौकरीला असलेल्या आरोपी सुनील नंदु सपकाळ वय अंदाजे २८ वर्षे रा. भिवगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर याचेसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर २ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपी सुट्टीवर आल्याने त्याने पिडीतेला भेटण्याबद्दल म्हटले. तेव्हा २८ ऑगस्ट रोजी पिडीता खामगाव येथे आली व तेथून दोघे दुचाकीने शेगाव येथे आले. शेगावात मेनरोडवरील एका हॉटेलात त्यांनी रूम घेतली. त्यावेळी आरोपीने पिडीतेवर जबरदस्ती केली व इच्छेविरूध्द अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने पिडीतेशी फोनवरून बंद करून त्याचा
फोन बंद करून ठेवला. त्यामुळे पिडीतेने ३० जानेवारी रोजी तिचे मावशीसोबत भिवापूर येथे जावून आरोपीचे वडील नंदु सपकाळ यांना झालेल्या घटनेचे कथन केले व सुनीलसोबत लम्न करण्याबाबत बोलणे केले. त्यावेळी नंदु सपकाळ यांनी आरोपी येथे आलाच नसल्याचे सांगितले.
त्यामुळे पिडीतेला तिची फसवणूक झाल्याचे समजून आल्याने तिने ४ फेब्रुवारी रोजी शहर पो. स्टे. ला उपरोक्त आरोपीविरूध्द लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील नंदु सपकाळ विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास एपीआय आयरे यांच्याकडे दिला आहे.



