आमच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन.सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन आमचा सत्कार करण्यात

आमच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन.सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन आमचा सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले आहे.मला राज्यस्तरीय पुरस्कार ज्ञानोबा विठोबा अभंग हा पुरस्कार मिळाला त्यानंतर हा पुरस्कार आज मला मिळाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन आमच्यात लढण्याची संघर्ष करण्याची समाजासाठी काम करण्याची एक नवीन ऊर्जा निर्माण करायचा काम या सन्मानाने केला आहे.छत्रपती फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती गुरु लहुजी वस्ताद या महापुरुषांच्या विचारावर काम करताना एक नवीन ऊर्जा निर्माण होते या महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर चालल्यानंतर गोरगरीब सामान्य माणसाचं काम कसं करावे अन्याय झालेल्यांना न्याय कसं मिळून द्यावे हे काम या महापुरुषांच्या विचारातून आपल्याला समजून येते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाचा अस्तित्व संविधानाच्या पानापानात करून ठेवलं त्या बाबासाहेबांचा त्याग प्रत्येक सामान्य माणसाच्या डोक्यात असला पाहिजे.बाबासाहेबांचा समतेचा रथ समोर नेण्याचा काम तरुण पिढीला केलं पाहिजे आंबेडकर चळवळ गतिमान केली पाहिजे,घरी सडून मरण्यापेक्षा चळवळीत लढून मरा येणाऱ्या पिढीला तुमचा आदर्श निर्माण होईल,असं काम आपण केलं पाहिजे हेच सर्वांना आवाहन करतो आणि परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचा काम केलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करून त्यांच्या कार्याला सल्यूट करतो.!!
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
🙏जय लहुजी जय भीम🙏



