खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भसंपादकीय

चिखलीच्या विनायक चा दिल्ली च्या संसदेत घुमला आवाज… बालविनायक वर होतो अभिनंदनाचा वर्षाव….

बुलढाणा जिल्ह्याची उंचावली मान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी

चिखली -शहरातील विनायक हा राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण बाल संसद २०२६ मध्ये दिल्लीच्या कार्यक्रमात नुकताच सहभागी झाला होता.
त्याच्या कौतुकास्पद कार्यामुळे चिखली शहराचीच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली आहे.
शहरातील विनायक राजेश मापारी हा बुलढाणा येथे सहकार विद्या मंदिरात इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे.
विनायक चे वडील राजेश मापारी हे चिखली येथील पोलीस विभागात कार्यरत आहे. राजेश मापारी हे मूळचे लोणार येथील रहिवासी आहेत. विनायक च्या दिल्ली येथे झालेल्या संसदेच्या कार्यक्रमातील विशेष कामगिरीमुळे लोणार शहराची पण मान उंचावली आहे.
विनायक ची ही कामगिरी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
त्याच्या दिल्ली येथील राष्ट्रीय पर्यावरण बाल संसद मधील विशेष कामगिरीमुळे विनायकच्या बुलढाणा सहकार विद्या मंदिराचा ही नावलौकिक वाढला आहे. त्याने पर्यावरण या विषयाची त्याच्या शैलीत विशेष मांडणी केली.तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील तसेच शिक्षक वृंद यांना देतो.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव , मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले, नगराध्यक्ष पंडित राव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाच्या चिखली विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी विनायक चा सत्कार करून भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button