दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीकडून सत्कार….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २७ मे २०२६
संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले यश हे गावासाठी अभिमानास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे होत्या. यावेळी पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायत च्या उपसरपंच कुसुम डाखोडे, सदस्य सौ. लीलाताई मुंडे, व विलास भाऊ कंकाळ, पार्वताबाई हातेकर, ग्रामपंचायत अधिकारी डी. जी. मारोडे, शिपाई रमेश हातेकर, रोजगार सेवक देविदास मेहंगे, संजय मुंडे आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक सहकार्य केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाने पिंप्री काथरगावचा शैक्षणिक गौरव उंचावला….



