बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने अधिकाधिक भरीव मदत देण्याची गरज; खासदार मुकुल वासनिक…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ११ ऑक्टोबर २०२६
सध्या जिल्ह्यासह संग्रामपूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला असतांना राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असून त्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरपूर मदत करावी अशी अपेक्षा असतांना पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी घोषणा केल्याप्रमाणे पुरेशी मदत मिळणार नाही. त्याकरता अधिकाधिक वाढीव मदत देण्याची गरज आहे. मी अपेक्षा करतो की शासन याकडे जातीने लक्ष देईल असे प्रतिपादन निवाणा येथे पत्रकारांशी बोलतांना राज्यसभा खासदार तथा अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. मुकुल वासनिक यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या नेतृत्वाखाली आज 10 /ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने मा. मुकुल वासनिक यांचा दौरा झाला आहे. प्रथम जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आगमन होऊन त्यांनी काँग्रेसचे निमखेड येथील माजी पदाधिकारी भरतसिंग भाटिया, पंचाळा येथील रामेश्वर खानझोडे तसेच निवाणा येथील बोरसे यांचे आईचे निधन झाल्याबद्दल सांत्वन पर भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्यात. ह्यावेळी खासदार मुकूल वासनिक पत्रकारांशी बोलतांना म्हणाले शिक्षक मतदार संघाची निवडणूक असून प्रचारालाही लागलो आहोत.पाचही जनसामान्यांचा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ह्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित व मित्रपक्ष समर्थीत उमेदवार निवडून येतील. तसेच आपण विचारल्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमध्ये ज्याप्रमाणे लोकशाही अभिप्रेत आहे त्याचे संपूर्ण विरोधात नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश कुमार यांना हाताशी धरून निवडणुकीचे काम करीत आहेत. त्यात अनेक घोळ झाले आहेत. त्यासाठी मा. राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढाकार घेऊन ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीन वर तातडीने बंदी टाकून मतदान करून घ्यावे. तसेच मागच्या दोन वर्षात जितक्याविधानसभेच्या निवड झाल्यात. त्या रद्द करून बॅलेट पेपरवर मतदान करून घ्यावेत. अशा तीन मागण्या त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर शेवटी निवाणा येथे संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण बोरसे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन ते जळगाव (जामोद) तालुक्यात रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार, माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे ,माजी आमदार कृष्णराव इंगळे ,जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे ,राम विजय बुरुंगले ,अविनाश उमरकर, संतोषराव राजनकर,केशव हिंगणे शिवाजीराव बुरुंगले यांचे सह जिल्ह्यातील व तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व इतर पदाधिकारी ,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button