Uncategorized

भांबेरी ता.तेल्हारा येथील विवेक वर्धीनी विद्या मंदिरच्या खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

*भांबेरी ता.तेल्हारा येथील विवेक वर्धीनी विद्या मंदिरच्या खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी -व्ही एम घोडे भांबेरी/तेल्हारा दि 3. विवेक वर्धिनी विद्यामंदिर भांबेरी व अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने विवेक वर्धिनी विद्या मंदिर ,भांबेरी येथे दिनांक 28/08/2023 व 29/08/2023 रोजी अकोला जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या .यामध्ये विवेक वर्धिनी विद्या मंदिर ,भांबेरी चे एकूण 5 खेळाडू जिल्हास्तरावर विजयी झाले असून त्यांची *विभागीय स्तरावर निवड झाली* आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विवेक वर्धिनी विद्या मंदिर ,भांबेरी विद्यालयाने आपला दबदबा कायम राखत अकोला जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यालयातील 5 खेळाडू विजयी झाले असून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.*14 वर्ष वयोगटातील*1. श्रुतिका नरेंद्र देशमुख*17 वर्ष वयोगटातील*1. विराणी विजय बोदडे2. आकांक्षा प्रकाश बोदडे*19 वर्ष वयोगटातील*1. श्रुती नितीन डवरे2. तेजस्विनी विनोद गवईवरील सर्व विद्यार्थी जिल्हा स्तरावर विजयी झाले असून त्यांची *विभागीय स्तरावर निवड झाली आहे*.त्याकरिता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बुद्धीबळ खेळाचे कोच *श्री.बाळासाहेब कौसल सर* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सर्व विजयी स्पर्धकांचे ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय *विजयरावजी कौसल* यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.जिल्हा स्तरावर विजयी झालेले स्पर्धक अमरावती विभागीय स्तरावर अकोला जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हा स्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. तळोकार सर,काळने सर, मोहाळे सर,बोराडे सर,रवी देशमुख , व गोपाल उमाळे यांनी काम पाहिले अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न झाल्या.सर्व विजयी खेळाडूंचे विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य *श्री.बाळासाहेब कौसल सर ,सर्व शिक्षक ,शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी* यांनी सत्कार केला व त्यांना विभागीय स्तरावरील स्पर्धा साठी *हार्दिक शुभेच्छा* दिल्या. यावेळी बाळासाहेब कौसल यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आमचे विद्यार्थी विभागीय स्तरावर विजयी होऊन राज्यस्तरावर निवड होईल व आमच्या विद्यालयातील *बुद्धिबळ खेळाचा दबदबा* कायम राहील.असा विश्वास व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button