खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.सौ.इंद्रायणी बढे,यांच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन

मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.सौ.इंद्रायणी बढे,यांच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन

:- (स्टार भारत एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर शहरातील सारा समरजीत कॉम्प्लेक्स मुक्ताईनगर येथे दि.०३/०९/२३ रोजी एमडी होमिओपॅथी डॉक्टर सौ इंद्रायणी बढे यांच्या दवाखान्याचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले उद्योग धंदा असेल हॉस्पिटल छोटी मोठी आस्थापने असतील याचे उद्घाटन बहुतांशी लोकप्रतिनिधी सेलिब्रेटी फिल्म स्टार यांच्या हातून उद्घाटन करण्याचा सध्या ट्रेंड असताना सौ. इंद्रायणी बडे यांनी मात्र आपल्या दवाखान्याचे उद्घाटन त्यांची आई श्रीमती सुशीला बाई भास्कर राव बरडे अकोला व सासूबाई सौ. दमयंती रमेश बढे व सासरे श्री.रमेश गुणाजी बढे रुईखेडा यांच्या हस्ते फीत कापून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यांनी केलेल्या उद्घाटनाचे सर्वांनीच कौतुक केले .निमित्त होते त्यांच्या वैद्यकीय सेवेला आज २५ वर्षे पूर्ण झालीत 26 व्या वर्ष्यात पदार्पण छोट्या दवाखान्या पासून आधुनिक सर्व रुग्ण सोई उपलब्ध असलेल्या मोठ्या रुग्णालया पर्यंत चा प्रवास. डॉ.इंद्रायणी बढे यांचे बी. एच. एम.एस चे शिक्षण औरंगाबाद व एम.डी कवीश्वर कॉलेज ऑफ होमिओपॅथी खामगाव येथून झाले आहे. २५ वर्षाच्या आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक असाध्य रोगांवर होमिओपॅथी पद्धतीने उपचार केले आहेत ज्यामध्ये स्त्रियांचे आजार लहान मुलांचे आजार, मतीमंद्यत्व, कॅन्सर, त्वचारोग सौंदर्य समस्या, वंध्यत्व यासारखे आजार होमिओपॅथी पद्धतीने रुग्ण कायमचे बरे होतात हे त्यांच्या 25 वर्ष्याच्या रुग्ण सेवेत यशस्वी पद्धतीने दाखवून दिले आहे. उद्घाटन प्रसंगी तालुका भरातील आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button