
मलकापूर प्रतिनिधी :- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बुलढाणा या विभागाकडून रिधोरा खंडोपंत ते धामणगाव बढे राज्य मार्ग क्रमांक ४४ या रस्त्याचे शिलकोटचे काम अधिकाऱ्यासह ठेकेदाराने संगनमताने कागदोपत्री पूर्ण केल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्वचे माजी जिल्हा संघटक गोपीचंद सुकदेव सुरवाडे यांनी केली आहे.
अधिक माहिती अशी की, राज्य मार्ग क्रमांक ४४ धामणगाव बढे ते
रिधोरा खंडोपंत हा रस्ता दर्जोन्नती करणे या रस्त्याचे काम २०१९ मध्ये केले आहे. रस्त्याचा दोष दायित्व कालावधी ५ डिसेंबर २०२४ रोजी संपत आहे. रस्त्याची लांबी ५ किलोमीटर ८०० मीटर अंतरात ठेकेदाराने धरसोड करून अंदाजे जवळपास चार ते साडेचार किलोमीटर चे शीलकोटचे काम केलेले नाही, अशी तक्रार गोपीचंद सुरवाडे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, बुलढाणा येथील कार्यालयाकडे १३ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यालयात टपालद्वारा तक्रार अर्ज दिल्यावर कोणत्याही प्रकारची तक्रार अर्जाची
दखल घेतली नाही. रस्त्याचा दोष दायित्व कालावधी ५ डिसेंबर २०२४ रोजी संपतो. दोष दायित्व कालावधी संपल्यावर ठेकेदार काम करीत नाही. रस्त्यावर अर्धवट अवस्थेत शिलकोटचे काम केलेले आहे. काम दोष दायित्व कालावधीच्या आत ठेकेदाराने न केल्यास गोपीचंद सुकदेव सुरवाडे यांनी त्या कामाची तक्रार अधीक्षक अभियंता, प्रधान मंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, विभाग अमरावती महाराष्ट्र, मुख्य अभियंता, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, पुणे यांच्याकडे केली आहे



