दिंडीतील वारकऱ्यांवर आगेमोहळाचा हल्ला

दिंडीतील वारकऱ्यांवर आगेमोहळाचा हल्ला
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव : श्रीं च्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त मुंगळा तालुका मालेगाव जिल्हा वाशीम येथील पायदळ दिंडीत सहभागी वारकऱ्यांवर आगेमोहळाच्या कळपाने अचानक हल्ला चढविल्याने २ गंभीर तर १९ जन जखमी झाल्याची घटना (ता.१२) दुपारी ४ वाजता घडली. नागझरी रोड वरील वट वृक्षाच्या फांदीवर असलेल्या आगेमोहळाच्या कळपाने अचानक हल्ला चढविल्याने सहभागी दिंडीतील चंद्रभागा भागवत राऊत ५० रा. मुंगळा ता.मालेगाव ओम कल्याण महानकर २० रा. अंजनगाव सुर्जी यांच्यासह १९ जनाना सर्वप्रथम येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. चंद्रभागा राऊत व ओम महानकर हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात
हलविण्यात आले आहे. तर उर्वरित १९ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती
रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.




