महाराष्ट्रविदर्भशेती

कर्जबाजारीपणाला कंटाळून माना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्षप्रेस्स अकोला प्रतिनिधी दत्ता सुलतानेकर्जबाजारीपणाला कंटाळून माना येथील शेतकऱ्याची आत्महत्या मूर्तिजापूर : तालुक्यातील माना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वे खाली येऊन आपली जीवनयात्रा संपविलायाची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी माना येथे घटली. दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माना येथील रेल्वे पुलाजवळ रेल्वे रुळावर खांब क्रमांक ६२३/२५ जवळ रेल्वेखाली झोकून देण्याच्या प्रयत्नात असताना दिलीप कोकणे यांना रेल्वेची जोरदार धडक बसली धडकेने ते रुळाच्या बाजूला फेकल्या जाऊन त्यांचा या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाला. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यावर युनियन बॅंकेचे व खाजगी कर्ज असल्याने त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी माना पोलीस अधिक तपकरीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button