बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील भोपळे कॉलेजच्या खेळाडूची राज्यस्तरापर्यन्त झेप, विभागस्तरीय मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड दि.२७; हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालयाच्या शिर पेच्यात रोवल्या गेला मानाचा तुरा. महाराष्ट्र शालेय व क्रीडा विभाग संचालनालयाचे अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयातील कु.मयुरी सुभाषराव नराजे हिने हातोडा फेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. या वर्षी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनींनी जिल्हास्तर व विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. या राज्यस्तरीय सहभागासाठी झालेली खेळाडूंची निवड विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची प्रतिक्रिया महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी व्यक्त केली. या क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थेचे कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, युवा संचालक प्रा.कौस्तुभ भोपळे तथा समस्त संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेतील खेळाडू सहभागासाठी भोपळे कॉलेजचे प्राचार्य संतोषकुमार राऊत, तालुका क्रीडा संयोजक शांतीकुमार सावरकर, तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थीनी क्रीडा प्रमुख पद्मा टाले, दुर्गा बोपले, आरती इंगळे, प्रतिभा चोपडे, मयूर लहाने, निलेश गिऱ्हे, रंजित राठोड,निलेश कासोटे, सुनील वाकोडे, महिला पालक प्रतिनिधी स्वाती गावंडे, सुलभा गावंडे, मंदा पिंपळकार,चित्ररेखा गावंडे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे, क्रीडा सहाय्यक दिनेश शर्मा, गौरव डालके आदींनी सहकार्य केले. तसेच कु.मयुरी नराजे हिने मिळविलेल्या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button