महाराष्ट्रमुबई

खासदार तथा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य राजेंद्र गावित व आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीने बिगर आदिवासींचे उपोषण स्थगित*

*खासदार तथा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य राजेंद्र गावित व आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीने बिगर आदिवासींचे उपोषण स्थगित*

वाडा – पालघर – (सचिन शेलवले )

पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु असलेल्या पेसा शिक्षक भरती मध्ये सरळसेवा पद्धतीने सुरु असलेल्या ऑफलाईन भरतीमधील शिल्लक राहिलेल्या रिक्त पदांवर बिगर आदिवासी पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी. तसेच पेसा क्षेत्रातील क व ड संवर्गातील सर्वच पदभरतीमध्ये बिगर आदिवासी समाजातील पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी. या मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजातील नोकरी पात्र उमेदवारांनी दि. २५ ऑक्टोबर पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी दि. २६ ऑक्टोबर रोजी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व पेसा क्षेत्राशी निगडीत असलेल्या निर्णायक अशा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य राजेंद्र गावित तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राजेंद्र गावित यांनी पेसा क्षेत्रातील सर्वच जिल्ह्यांतील वादांकित आरक्षणावर तोडगा काढून आदिवासी व बिगर आदिवासी अशा सर्वच समाजांना न्याय मिळण्यासाठी लवकरच शासन स्तरावर एका बैठकीचे आयोजन करुन समान न्यायाच्या दृष्टीने तोडगा काढला जाईल तसेच उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करुन बिगर आदिवासी समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले.तर आमदार राजेश पाटील यांनी लवकरच आदिवासी-बिगर आदिवासींमधील आरक्षण व समज-गैरसमजांबाबत पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व बिगर आदिवासी समाज घटकांच्या शिष्टमंडळासोबत समन्वयाची बैठक करण्याबाबत मनोदय व्यक्त केला. वरील दोन्ही लोकप्रतिनिधी व जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सदर आंदोलनात स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने चर्चा करण्यासाठी बिगर आदिवासी समाजाच्या वतीने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, कुणबी समाजनेते जितेंद्र राऊळ, संपादक शरद पाटील, आंदोलन समन्वयक युवराज ठाकरे, प्रशांत पाटील, अॅड. राहुल ठाकरे, दिपेश पावडे, ऋषिकेश सावंत, यांनी प्रमुख भूमिका बजावली. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे, सदस्या भक्ती वलटे, पालघर पंचायत समिती सदस्य कमळाकर अधिकारी, तृप्ती पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश डोंगरे, कुणबी सेना नेते परशराम सावंत, कुणबी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नेते उत्तम पिंपळे, ज्ञाती समाज मंडळाचे पालघर जिल्हा अध्यक्ष संतोष पावडे, कॉंग्रेस आयचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, कुणबी सेना वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक घरत, सदाशिव पाटील, प्रितम पाटील, धिरज पाटील, जयेश पाटील, उमेश पाटील, शाहीर गंगाराम घरत, जितेंद्र घरत, प्रक्षेप पाटील यांच्यासहित विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button