आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुनील शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – मालेगाव शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवरून संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता सुनील शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी येथील सभेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता गेल्या दोन वर्षांपासून शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाविरोधात लढा दिला आहे अनेकदा उपोषण करून आणि तक्रारी देऊनही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी प्रियंका धायगुडे यांनी लेखी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे शर्मा यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने त्यांची तातडीने दखल घेतली आणि त्यांना शांततेसाठी ताब्यात घेतले या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून प्रशासनाची भूमिका आणि त्याची तत्काळ कारवाई यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



