आठवडी बाजारात मटन मार्केटमध्ये चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव । काल २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आठवडी बाजारातील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या मटन मार्केटमधील दोन दुकानांच्या शटरची कुलूप तोडून दुकानातील १२० किलो बाम मासळी व या व्यवसायाकरिता उपयोगी अवजारे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. घटनेतील चोरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.
या चोरीच्या घटनेसंदर्भात फिर्यादी शेख आशिक शेख कतीब (३६) रा. जमजम नगर शेगाव यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा | मासळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याकरिता आठवडी बाजारातील न.प.च्या | मटन मार्केटमधील दुकान क्रमांक ४९ हे त्यांच्या ताब्यात असून त्यामध्ये | विक्रीसाठी आणलेला मासळीचा माल ठेवतात. त्या अनुषंगाने काल २६ | ऑक्टोबर रोजी त्यांनी १८० किलो मासळी विकत आणली व त्यांच्या | ताब्यातील दुकानात बर्फाच्या खोक्यामध्ये ठेवली व रात्री ९ वाजता सुमारास ते दुकानाचे शटरला कुलूप लावून घरी परतले,
त्यानंतर आज २७ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उपटण्यासाठी गेले असता दुकान उघडल्यानंतर त्यांना त्यांच्या दुकानातील ३० हजार रूपये किमतीची १२० किलो मासळी चोरीला गेल्याचे आढळून आले. तसेच त्यांचे दुकानाच्या शेजारी असलेल्या शेख जफर से अयुब (२७) यांचे दुकान क्रमांक ५२ मधून ५ हजार रुपये किमतीचे व्यावसायाला आवश्यक एक स्टीलची बकेट, मोठे सुरे ४ नग, लहान सुरे ४ नग चोरून नेल्याचे आढळून आले. कोणीतरी अज्ञाताने ही चोरी केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर चोरटे कैद झाले असावेत असा संशय से आशिक यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ४५३, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोहेकॉ गवई हे करित आहेत.



