तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त लावलेले निळ्या झेंड्याची विटंबना केली विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणी करिता.

तेल्हारा प्रतिनिधी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे
दि.१५/४/२०२५
प्रति
निवेदन
अकोला पोलीस अधीक्षक साहेब
अकोला जिल्हा अकोला.
विषय
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त लावलेले निळ्या झेंड्याची विटंबना केली विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणी करिता.
महोदय
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ला जगभरात भीम जयंती साजरी होत असते जयंती साजरी होत असताना तेल्हारा तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी गावातील काही भीमसैनिकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर निळा झेंडे व धम्म ध्वज लावले होते परंतु काही जातिवाद्यांना हे सहन झालं नाही त्यांनी या झेंड्याची
विटंबना केली निळे झेंडे काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले.
ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु काही संघटनेने विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला यामुळे संपूर्ण तेल्हारा तालुका बंद करण्यात आला विनाकारण दोन समाजात दंगे भडकून वातावरण दूषित करायचे उद्देशाने हा प्रकार करण्यात आला.ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल न होता न्याय मागण्यासाठी गेलेल्या 37 भीमसैनिकांवरच खोटे गुन्हे दाखल करून आज सकाळी तरुणांची धरपकड सुरू केली आहे.ज्यांनी निळे झेंड्याची विटंबना केली त्यांच्यावर मात्र काही गुन्हा दाखल नाहीत.हा अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार आहे पोलीस प्रशासनाने ज्यांनी विटंबना केली आमच्या भावना दुखावल्या समाजावर बहिष्कार टाकला त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे आहे ॲट्रॉसिटी अंतर्गत खालील प्रमाणे गुन्हे दाखल करा.
जातीसंबंधी अपशब्द वापरणे.अधिनियम कलम ३(१)(s) गुन्हे दाखल करा
धार्मिक मानल्या जाणाऱ्या अथवा श्रद्धास्थान असलेल्या स्थळांना हानी पोहचविणे, महापुरुषांची विटंबना करणे.नष्ट करणे किंवा विटंबना करणे.
अधिनियमांचे कलम ३(१) (t) मध्ये दाखल करा.
अनुसूचित जाती जमातीवर सामाजिक व आर्थिक बहिष्कार टाकणे किंवा तशी धमकी देणे.(अधिनियमांचे कलम ३(१) (झेडसी)
अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात खोटा पुरावा देणे किंवा खोटा पुरावा तयार करणे.खोट्या केसेस मध्ये फसवणे (अधिनियमांचे कलम ३(२) (i) आणि (ii))
बळजबरीने घर,गांव किंवा रहिवास सोडण्यास विवश करणे,जबरदस्ती करणे.
अधिनियमाचे कलम ३(१)(z) गुन्हा दाखल करणे.अनुसूचित जाती जमातीवर तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा अत्याचार चालू आहे.तात्काळ यावर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी करिता आम्ही निवेदन देत आहोत.!!
आकाश दादा शिरसाट
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य




